सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक नकारात्मक विचार आपल्या मेंदू आणि मनावर कब्जा करु पाहत आहेत. अडीच हजार वर्ष जूनी भारतीय साधना ही नकारात्मक विचारांना रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. मागच्या १४ वर्षांपासून अधिक नितीन महाडिक हे ह्या साधनेचे अभ्यासकर्ते आणि संशोधक आहेत. नितीनजींनी अभिनय आणि इमोशनल इंटेलिजन्स सारख्या विषयांना माईंडफुलनेसोबत जोडून ह्या साधनेचे अनेक पैलू अभ्यासले आहेत. जगातील नामांकित कॉर्पोरेट कंपन्या त्याचबरोबर एनजीओस् मधील अधिकाऱ्यांना नितीन महाडिक ह्यांनी माईंडफुलनेसचे धडे दिले आहेत. नकारात्मक विचारांवर ताबा मिळवण्यासाठी आणि नितीनजींची मुलाखत संपूर्ण ऐकण्यासाठी आमचा हा व्हिडिओ आवर्जून पहा.