देव आनंद या नावावर कित्येक पिढ्यांनी मनापासून प्रेम केलं. देव आनंद म्हणजे स्टाईल, देव आनंद म्हणजे रोमान्स, देव आनंद अभिनेता, देव आनंद म्हणजे व्यक्तिरेखा. देव आनंद हे रसायनच वेगळं होतं. प्रियकराची भूमिका असू देत किंवा चरित्र नायकाची देव आनंद तितक्याच ताकदीने पडद्यावर यायचा आणि चाहत्यांची, प्रेक्षकांची, समीक्षकांची मनं जिंकून जायचा. असा हा देव आनंद ३ डिसेंबर २०११ रोजी हे जग सोडून गेला आणि त्याच्या दहाव्या स्मृति दिनानिमित्त देव आनंदवर टाकलेला हा फिल्मी फोकस.