मुंबई शहरात गँगवॉर नावाचा रोग हाताबाहेर गेला होता, तेव्हा सरकारला त्यावर एन्काऊंटर नावाचा अक्सीर इलाज सापडला. एन्काऊंटर स्पेशालिस्ट नावाची एक नवी जमात निर्माण झाली. काही जण एन्काऊंटरच्या इतके प्रेमात पडले की एन्काऊंटरचे अर्धशतक, शतक कसे पूर्ण व्हावे म्हणून झटू लागले. अनेकांवर सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचे आरोप झाले. अनेक जण तुरुंगात गेले. डोक्यात हवा गेल्याचे परीणाम दुसरे काय. डोक्यात गेलेली हवा वाईटच, कायम माती करते. मनोज जरांगे पाटील यांची परीस्थितीही वेगळी नाही. नवा नवा जन्म झालेल्या खोंडाच्या डोक्यात हवा जावी आणि ते चौखूर उधळावे, तसे त्यांचेही झालेले आहे. ते सध्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट होण्याची तयारीला लागलेले आहेत.