एल्गार नावाची वाळवी

एल्गार नावाची वाळवी

एल्गार परिषदेत हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या शर्जील उस्मानी विरोधात अखेर एफआयआर दाखल झाला आहे. एल्गारच्या माध्यमातून त्याचा जिहादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. या परिषदेत त्याने अनेक खोटी अथवा अर्धवट उदाहरणे देऊन या देशात मुसलमानांवर कसे अत्याचार होतात असे धादांत खोटे नरेटिव्ह मांडायचा प्रयत्न केला. त्याच्या याच खोट्या मांडणीतल्या प्रत्येक मुद्द्याचे सप्रमाण खंडन करून त्याला उघडं पाडण्याचे काम ‘न्युज डंका’ चे सल्लागार संपादक आमदार अतुल भातखळकर यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.

पहिली एल्गार परिषद इतकी वादग्रस्त ठरलेली असताना दुसऱ्या एल्गार परिषदेला पोलीस प्रशासनाने परवानगीच का आणि कशी दिली हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. समाजात जातीय,धार्मिक मुद्द्यांवरून तेढ निर्माण करण्यासाठी या देशाच्या मुळावर उठलेल्या वक्त्यांना खुले व्यासपीठ देण्याचे काम एल्गारच्या माध्यमातून केले जाते हे आता सिद्ध झाले आहे.

शर्जील उस्मानी याचा इतिहासही असाच वादग्रस्त राहिला आहे. नागरिकत्व कायद्याचा विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात शर्जीलला अटक करण्यात अली होती आणि सध्या तो जामीनावर बाहेर आहे. याच शर्जील उस्मानीने बाबरी ढाचा पुन्हा बांधण्याचे चिथावणीखोर विधान केले होते.

Exit mobile version