महाराष्ट्रात सध्या जुन्या पेन्शनवरून सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र ही मागणी महाराष्ट्राच्या हिताची नाही हे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विरोधकांनीही सत्तेत असताना या पेन्शनला विरोध केलेला आहे. जनताही या आंदोलनाच्या पाठीशी आहे असे वाटत नाही.