कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून आंदोलने होत आहेत. हा प्रकल्प इथे होऊ नये म्हणून स्थानिकांच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. त्यामागे राजकारणही आहे. कोकणात कोणताही प्रकल्प आला की, त्याला विरोध ठरलेलाच. खरोखरच कोकणाला प्रकल्पांची गरज नाही का?