राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांनी काही नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या तेव्हा अजित पवारांकडे एखादी जबाबदारी येईल असे वाटले होते पण तसे काहीही झाले नाही. पण आता अजित पवारांनीच आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाचा कंटाळा आलेला आहे, असे म्हटले आहे त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणाचे ते केंद्रबिंदू ठरणार आहेत.