५ एप्रिल १९९३ हा हिंदी चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक दिवस ठरला. त्या रात्री दिव्या भारतीचे निधन झाले. आपल्या घराच्या खिडकीतून ती पडल्याने तिचा अपघाताने मृत्यू झाला की ती आत्महत्या होती की आणखीन काही यावर बरीच उलटसुलट वादळी चर्चा झाली. पण अतिशय वेगाने आपली क्रेझ निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली होती.