दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील एक नितांत सुंदर व सुरक्षित समुद्र किनारा. निसर्गाने भरभरून दान दिलेल्या आपल्या कोकण किनारपट्टीवरील गर्द हिरवाईने नटलेल्या दिवेआगरला अनोखे पक्षीवैभव आढळते. नानाविधी रंगाचे लहान-मोठे तसेच दुर्मिळ पक्षी पाहायची संधी देते. चला तर आज जाऊया अद्भूत रंग असलेल्या या पक्षी निरीक्षणाला.