फादर फ्रांसिस दिब्रेटो यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूनंतर वैर संपते ही सनातन धर्माची भूमिका आहे. परंतु मृत्यूनंतर एखाद्याच्या जीवीत कार्याची चिकित्सा होऊ नये, असा काही नियम नाही. मनात कोणतीही वैर भावना किंवा आकस न बाळगता अशा प्रकारची चिकित्सा होऊ शकते. अशाप्रकारची चिकित्सा समाजवादी विचारवंत, युवक क्रांति दलाचे संस्थापक आणि प्रकांड पंडीत मे.पू.रेगे यांनी दिब्रेटो यांच्या हयातीत केलेली आहे. त्याचा संदर्भ देत महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी केलेली एक पोस्ट प्रचंड चर्चेत आहे. या चर्चेमुळे दिब्रेटोंचा बुरखा तर फाटलाच आहे, त्यांचे खंबीर समर्थक असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचा दांभिकपणाही लोकांसमोर आलेला आहे.