मुख्यमंत्री घरी बसलेत, मंत्रीपदाची शपथ न घेतलेले लोक राज्य चालवतायत… देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

मुख्यमंत्री घरी बसलेत, मंत्रीपदाची शपथ न घेतलेले लोक राज्य चालवतायत...  देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

राज्यात सध्या मुख्यमंत्री सरकार चालतायत असं वाटत नाही. ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाही असे नेते सरकार चालवत आहेत, गोपनीय फाईल्स घरी नेऊन निर्णय घेतले जात आहेत, घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज डंकाला मुलाखतीत केला.

राज्याच्या अनेक प्रश्नांवर ते दिलखुलासपणे व्यक्त झाले. भंडाऱ्यात रुग्णालयात आग लागून १० बालकांचा जीव गेला, आग विझवण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाला. त्यामुळे हा केवळ अपघात नसून याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली. ही घटना राज्यसरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात कोणतीही घटना घडली की त्यावर पंतप्रधान मोदींना दोषी ठरवण्याचं काम हे सत्ताधारी पक्षांकडून केलं जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही असेही त्यांनी सांगितले. भंडा-याच्या घटनेचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नसतानासुद्धा मोदींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न  ‘हास्यास्पद आणि निर्लज्ज’ आहे. माझे कुटुंब माझी जवाबदारी पण राज्याची आणि देशाची जवाबदारी ही मोदींची असा प्रक्रार चालू आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

मराठा आरक्षण आणि असे इतर अनेक मुद्दे जे भाजपा सत्तेत असताना आंदोलनांच्या रूपाने पेटवले जात होते ते मुद्दे आता थंड केले गेले, जे लोक प्रामाणिक पणे आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर गुन्हे दाखले केल जातायत. आंदोलन करत होती तीच आज सत्तेत आहे आणि त्या मुद्द्यांवर शांत आहेत.

पाहा देवेंद्र फडणवीसांची विशेष सविस्तर मुलाखत फक्त न्यूज डंकावर…

Exit mobile version