नुकताच एलआयसीचा आतापर्यांतचा सर्वात मोठा आयपीओ आला. जो ४ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून ९ मे पर्यंत खुला असणार आहे. आता सेबीकडून परवानगी मिळाल्यानंतर आणखी ९ कंपन्या त्यांचा IPO बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यातील एका कंपनीचा आयपीओ ११ मे ला येतोय. ही कंपनी म्हणजे वितरण क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांनपैकी एक असून या कंपनीचे नाव डेलिव्हरी लिमिटेड असं आहे.