राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते नवाब मलिक यांना माफिया डॉन दाऊद इब्राहीमची प्रॉपर्टी घेतल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. पण मग राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल का सुटले? कारण त्यांनी दाऊद गँगच्या इक्बाल मिर्ची याची वरळीतील सी फेसिंग प्रॉपर्टी त्याच्या पत्नीकडून विकत घेऊन त्या जागेवर टोलेजंग इमारत उभी केली होती. ताज्या घडामोडी नंतर आता ते गोत्यात येणार आहेत काय?