उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथील एका मुस्लीम समाजाच्या मुलीने हिंदू समाजाच्या मुलाशी प्रेमसंबध असल्याच्या कारणावरून त्या मुलीच्या दोघा भावांनी तिची हत्या करून तिचा मृतदेह गाझियाबादच्या मुरादनगर भागातील गंगा कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. शिबा (वय अंदाजे १७-१८) असे त्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचे भाऊ सुफीयान (वय २१) आणि महताब (२४) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या गंगा कालव्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे शिबाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला नाही. या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि गाझियाबाद पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे.
शिबाचे हिंदू मुलाशी प्रेमप्रकरण आहे, हि बाब तिच्या कुटुंबियांना आवडली नव्हती. त्यामुळे तिला दिल्लीमधील तिच्या चुलत बहिणीकडे पाठवण्यात आले होते. मात्र तिथे सुद्धा ति तिच्या प्रियकराच्या संपर्कात फोनवरून होती. हि बाब शिबाचा चुलत भाऊ महताब समजल्यानंतर त्याने हा प्रकार शिबाचा सख्खा भाऊ सुफीयानला सांगितला आणि त्यांनी शिबाच्या हत्येचा कट रचला. महताब आणि सुफीयान या दोघांनी शिबाला फिरायला जाण्याच्या बहाण्याने गाझियाबादमधील मुरादनगर येथे आणले. तेथे त्यांनी शिबाचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर मृतदेह गंगानगरच्या कालव्यात फेकून दिला.
हेही वाचा..
मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न
दाऊदच्या बातमीनंतर डोंगरीत सन्नाटा…
नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा
अतिक अहमदचा सहकारी नफिस बिर्याणी मृत्युमुखी!
या संदर्भात माहिती देताना पोलीस उपाधीक्षक विवेक चंद्र यादव म्हणाले, यातील दोघेही संशयित हे शिबाचा खून करून पायी परतत होते. तेव्हा तेथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा ते दोघेही घाबरलेले होते. दोघे संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना मुरादनगर पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्यांनी आपल्या बहिणीच्या हत्येची कबुली दिली. तिच्या प्रेमप्रकरणामुळे समाजात आमचा अपमान केला जात होता त्यामुळे आम्ही तिची हत्या केली. हे दोघेही शिबासोबत रिक्षातून आले होते. त्यानंतर गंगानगर कालव्याजवळ ते दीड किलोमीटर चालले. याचवेळी संधीचा फायदा घेत त्यांनी शिबाची हत्या केली.
यातील शीबाचा सख्खा भाऊ सुफियान मजूर आहे. तर चुलत भाऊ महताब हा दिल्लीत रिक्षा चालवतो. या दोघांविरोधात खून आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांच्याही माहितीवरून पोलिसांनी शिबाच्या चप्पल, कपडे, आधारकार्ड आणि टॉवेल जप्त केला आहे.