बनावट नोटा छापण्यामागे सुशिक्षित तरुणांचं ‘कनेक्शन’

बनावट नोटा छापण्यामागे सुशिक्षित तरुणांचं ‘कनेक्शन’

ठाणे शहरात मागच्या काही काळापासून बनावट नोटांची तस्करी मोठ्या प्रमाण होत असल्याची माहिती पोलीस कारवाईतून समोर येत आहे.

गेल्या २ वर्षात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या ३३ आरोपींना पोलिसांनी पकडले असून त्यांच्या कडून ५ कोटी रुपयांच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे बनावट नोटा छापणारे आरोपी हे उच्च शिक्षित तरुण आहेत.

गेल्या काही महिन्यात ठाणे पोलिसांनी १ कोटी ५० लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. एक तरुण आरोपी बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न करीत होता. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाच्या घरावर छापा मारला असता, लाखो रुपयांच्या नकली नोटा सापडल्या. ठाणे क्राइम ब्रांचच्या पथकांनी मुंब्रा बायपास, येथे सापळा रचून मोहम्मद जैद चांदबादशाह शेख (२५) याला अटक केली असता, त्याची झडती घेतल्यावर १०० च्या अडीचशे नोटा सापडल्या.

आरोपीची कसून चौकशी केली असता, या नोटा एका १७ वर्षीय तरुणांकडून घेतल्यांचे सांगितले. ठाणे क्राइम ब्रांचच्या पथकाने १७ वर्षीय तरुणांच्या घरावर छापा मारला, तेव्हा पोलिसांना बनावट नोटा छापण्याचे साहित्य सापडले. त्यामध्ये लॅपटॉप, प्रिंटर्स, १०० व ५०० नकली चित्र तसेच नोटा बनवण्यासाठी लागणारे कागद सापडले. या नोटा छापून चलनात आणल्याचा पोलिसांना संशय आहे. जप्त केलेल्या नोटांवर एकच सिरीयल नंबर आढळला असून, या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आरोपीना पडकण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख

शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या

आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!

तरुणांचा असाही सहभाग

बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांमध्ये तरुणांचा समावेश मोठा प्रमाणात आहे. काही महिन्यापूर्वी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने मुंब्रा येथे सापळा रचून ११ लाख ४९ हजारांच्या नकली नोटांसह चौघांना अटक करण्यात आले आहे. यानंतर ठाण्याच्या वागळे इस्टेट गुन्हे पथकाने तिघांकडून ८५ लाख ४८ हजार रुपये नकली नोटा जमा केल्या आहेत. इगतपुरी येथे बनावट नोटांच्या छापखान्यावर छापा टाकण्यात आला व चौकशीअंती तरुणाने चीनमधून नकली नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यात आता पर्यंत सगळ्यात जास्त नकली नोटा घरात छापल्याची कबुली गुन्ह्यातील आरोपीने दिले आहे. पोलिसांनी प्रिंटर्स व विशिष्ट साहित्य प्रकार नकली नोटासह जमा केले आहेत.

Exit mobile version