पार्थ चॅटर्जीची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी चालवत हाेती १२ बनावट कंपन्या

पार्थ चॅटर्जीची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी चालवत हाेती १२ बनावट कंपन्या

ईडीने मुखर्जींना पीएमएलए कोर्टात केले हजर, असा झाला खुलासा

ममता बॅनर्जी यांचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने चॅटर्जीबाबत अनेक खुलासे केले आहेत. सोमवारी ईडीने चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीला पीएमएलए कोर्टात हजर केले. ईडीने कोर्टाकडे चॅटर्जी आणि मुखर्जी यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. यादरम्यान, ईडीने न्यायालयाला सांगितले की, पार्थ चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी आर्थिक गैरव्यवहारासाठी १२ बनावट कंपन्या चालवायची असे प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे.

ईडीने न्यायालयाला सांगितले की, हा गंभीर घोटाळा आहे. त्यामुळे तपासासाठी ईडीने दोन्ही आरोपींना १४ दिवसांची कोठडी द्यावी. ईडीने न्यायालयाला सांगितले की, शिक्षक भरती घोटाळ्यातील अपात्र लोकांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली आहेत. ज्याच्या बदल्यात पैसे घेतले आहेत. कोर्टासमोर स्पष्टीकरण देताना ईडीने सांगितले की, अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी दोघेही संयुक्तपणे मालमत्ता खरेदी करत होते. या दोन्ही घरातून संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान

खासदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा अधिकार कुणी दिला ?

अमरनाथ आपल्याकडे आणि शारदा पीठ पाक व्याप्त काश्मीरमध्ये हे कसे चालेल?

लोकसभेत फलकबाजी; काॅंग्रेसचे चार खासदार निलंबित

 

टीएमसी नेते पार्थ चॅटर्जी तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. एवढेच नाही तर चॅटर्जी त्यांच्या अटकेच्या कागदपत्रांवरही सही करत नाहीत. त्याचवेळी, सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयाने चटर्जी यांची प्रकृती खालावल्याने ईडीला चेन्नईच्या एम्समध्ये दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चॅटर्जी यांना विमानाने चेन्नईला नेण्यात आले. जिथे हॉस्पिटलबाहेरील लोकांनी ‘चोर चाेर’ असा आरडाओरडा सुरू केला.

दोन दिवसांपूर्वी टीएमसी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. यासोबतच त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या घरावरही छापा टाकण्यात आला, तेथून २१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

Exit mobile version