पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….

पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….

पोलीस भरतीसाठी २०१९ साली जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये भरतीसाठी १०७६ पदांची लेखी परीक्षा २०२१ मध्ये पार पडली. या लेखी परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी ‘डमी’ परीक्षक म्हणून परीक्षेला बसले होते. भरती प्रक्रियेतील उमेदवार दीपक घोडके याच्यासाठी लेखी परीक्षा देणाऱ्या ‘डमी’ उमेदवाराविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस भरतीमधील ‘डमी’ प्रकरण उघडकीस आल्या नंतर आता पर्यंत १० ते १२ तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे.

लेखी परीक्षा, मैदानी चाचणी पूर्ण झाल्या नंतर, वैद्यकीय आणि कागद पडताळणी घेण्यात आली. यामध्ये प्रत्यक्ष लेखी व मैदानी चाचणी पूर्वी घेण्यात आलेल्या चित्रीकरणात टिपलेले चेहरे व प्रत्यक्ष उपस्थित असलेले चेहरे यामधील साम्य तपासण्यात आले. मार्चमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यापैकी १३३ तरुणांना नियुक्तीपत्र घेण्यासाठी २९ जुलै रोजी बोलावण्यात आले होते.

१३३ उमेदवारांची मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी दरम्यान करण्यात आलेले चित्रीकरणांची खातरजमा करण्यासाठी पुन्हा तपासण्यात आले. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील २२ वर्षीय उमेदवार दीपक घोडके यांच्या वतीने लेखी परीक्षेत अन्य व्यक्तीस बसवल्याचे चित्रीकरणामुळे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी लेखी परीक्षेदरम्यान उमेदवारांनी स्वाक्षरी केलेले कागद तपासले. ह्यामध्ये बरीच तफावत आढळून आली.

हे ही वाचा:

‘मासिक पाळी’ प्रकरणातील मुलीनेच रचला होता बनाव!

असा झाला ‘तिरंग्या’चा जन्म !

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले

…आणि पृथ्वी स्वतःभोवती जोरात फिरली

नियुक्ती पत्र घेण्यासाठी आलेले घोडके यांना या बाबत विचारणा केली असता, लेखी परीक्षा देणाऱ्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगितले. या प्रकरणी सरकारची फसवणूक केल्या प्रकरणी दीपक आणि त्यांच्या वतीने परीक्षा देणाऱ्या व्यक्तीविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘डमी’ उमेदवार प्रकरणात ह्याआधी आरोपीना अटक करण्यात आली आहे. दीपकसाठी परीक्षा देण्यातमागे काय संबंध आहे ? याचा पोलीस तपास करीत आहे.

Exit mobile version