कोविड आणि पर्यावरणीय बदल

Climate Change and COVID-19| पर्यावरणीय बदल आणि कोविड-१९

आपण आणि पर्यावरण वेगळे आहोत का? मानवाच्या वर्तणुकीचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? पर्यावरणीय बदल आपल्यावर उलटायला लागले आहेत का? कोविड आणि पर्यावरणीय बदलांचा नेमका काय संबंध आहे?

हे प्रश्न सामान्य माणसाला पडतात. पर्यावरणीय बदल हे आपल्यापासून लांब आहेत, आपला आणि त्यांचा काही संबंध नाही असं सामान्यपणे मानण्याकडे वृत्ती असते. किंबहुना, पर्यावरणीय बदल हे केवळ कारखान्यांमुळे होतात असंही समजलं जाऊ लागलं आहे. मात्र वास्तव काय आहे? कोविडचा आणि पर्यावरणीय बदलांचा काय संबंध आहे? याविषयावर सायन्स डेली या वेबसाईटवर कोविड आणि पर्यावरणीय बदलांचा संबंध जोडून दाखवला आहे. चीनमधल्या बदलत्या वातावरणामुळे कोविडचे वाहक असलेल्या वटवाघूळांची संख्या वाढली. त्यामागची पर्यावरणीय कारणं नेमकी काय? आणि ही घटना भयावह का ठरते हे या व्हिडियोमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

खरोखरच पर्यावरणीय बदल आपल्याशी किती जवळून निगडीत आहे, हे कोविडने आपल्याला एक तऱ्हेने दाखवून दिलं आहे. त्याचे थेट परिणाम आपल्यावर कोणत्याही मार्गाने होऊ शकतो. कोविडचा हा सर्वात मोठा धडा आहे. मात्र आपण यातून शिकणार किती हा कळीचा मुद्दा आहे.

Exit mobile version