तांबे आणि काँग्रेसचे पितळ

तांबे आणि काँग्रेसचे पितळ | Sudarshan Surve | Satyajit Tambe | Nana Patole | Congress |

नाशिक पदवीधर निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. काँग्रेसचे उमेदवार सत्यजीत तांबे नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काँग्रेसला रामराम करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. काँग्रेसकडून त्यांना सहा वर्ष निलंबितही केलेय. त्यानंतर सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलून, ट्विटर डीपी आणि बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेखही काढून टाकला होता. या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय झाला. सत्यजीत तांबे यांची पुढील भूमिका काय असणार. याबाबत सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट केली. आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होतो आणि अपक्ष म्हणूनच भविष्यात काम करणार, असं सत्यजीत तांबे यांनी भूमिका घेतली. बाळासाहेब थोरात आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न प्रदेश अध्यक्ष नाना पटोले करताहेत असा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस पत्रकारांसमोर केलाय.

Exit mobile version