किती ही इशारे दिले, तरी शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाहीत, याची काँग्रेसला इतकी खात्री झालेली आहे, की दर चार दिवसांनी यांना टपल्या मारल्याशिवाय त्यांना अन्न पचत नाही. माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. तरीही शिउबाठाचे नेते मुग गिळून बसलेले आहेत. एकीची वज्रमुठ कायम आहे. या मुठीला कोणताही तडा गेलेला नाही.