हिंदुत्ववादी सरकार म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा विश्व हिंदू परीषदेने दिलेला आहे. वक्फ बोर्डाला १० कोटीचे अनुदान देण्याच्या निर्णयाविरोधात हा ईशारा देण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला दारुण पराभव आणि मविआला मिळालेल्या घवघवीत यशाचे एक महत्वाचे कारण मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण. मुस्लीम मतांची सध्या खूप चर्चा आहे. त्यामुळे धास्तावलेल्या महायुती सरकारने मुस्लीमांना खूष करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का, असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे.