चिदंबरम यांनीच नष्ट केला होता २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा | Dinesh Kanji | P. Chidambaram |

गेली १७ वर्ष ज्या खतरनाक दहशतवाद्याचा ताबा घेण्यासाठी भारत प्रयत्न करतोय तो क्षण अखेर काल गुरुवारी आला. २६/११ रोजी मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वरू हुसेन राणा याची अमेरीकेतून भारतात पाठवणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरीका भेटीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिलेला शब्द पाळला. राणा भारतात आल्यानंतर देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी लगेच नसलेल्या मिशांना पिळ देऊन हे श्रेय आमचेचे असा दावा केला. बथ्थड डोक्याच्या माणसाचाही यावर विश्वास बसणार नाही कारण, यूपीएच्या काळात देशात जेव्हा दहशतवाद्यांचे तांडव सुरू होते, सरकारच्या रडारवर दहशतवादी नव्हतेच. सगळ्या तोफा भाजपाचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या विरोधात वळवण्यात आल्या होत्या. २६/११ च्या षडयंत्राचा उलगडा करेल असा एक अत्यंत महत्वाचा पुरावा स्वत: चिदंबरम यांनी नष्ट केला होता.

Exit mobile version