विशाळगडाला बेकायदा बांधकामांचा वेढा पडलाय. गड किल्ले म्हणजे शिवकालीन इतिहासाची मंदीरे, या मंदीरांमध्ये मटणाची दुकाने आणि मौज मस्तीसाठी लॉज थाटण्यात आली. इथे मौज करण्यासाठी निलाजरे हिंदू सुद्धा जात असत. सोमवारी या बांधकामांवर कारवाईचा हथोडा पडताच मीडिया आणि सेक्युलर नेत्यांना पुळका आलेला आहे. या नेत्यांमध्ये छत्रपतींचे वंशज म्हणवणारे शाहू छत्रपतीही आहेत. त्यांनी थेट गडावरील अनधिकृत दर्ग्यालाच भेट दिली. मुस्लीमांनी ज्यांना मते देऊन विजयी केले, त्या मविआच्या नेत्यांना मुस्लीम मतांचे ठेकेदार या कारवाईवरून जाब विचारतायत. डोळे वटारून दाखवतायत. या बांधकामांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या संभाजी राजेंना, हिंदुत्ववादी संघटनांना, कारवाई करणाऱ्या राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.