छावा या चित्रपटाच्या माध्यमातून नवा इतिहास घडला आहे. मुघलांच्या क्रौर्याचा, धर्मांधतेचा जो इतिहास दडवला गेला, तो या चित्रपटातून समोर आला. धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण या चित्रपटातून होते आणि आपल्यासमोर हे दाहक वास्तव समोर येतं. हिंदी चित्रपटात हे याआधी कधी कुणी दाखविण्याचा प्रयत्नही केलेला नाही.