राष्ट्रवादीशपच्या प्रवक्ता बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी फक्त भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे तुजसे वैर नही, देवेंद्र तेरी खैर नही… अशी बातमी सुत्रांच्या हवाल्याने व्हायरल होते आहे. हे जरी सत्य असले तरी त्यात नवीन काही नाही. सुप्रिया सुळे जर असे म्हणाल्या असतील तर इतिहासातील चुकांपासून शिकण्याची त्यांना सवय नाही, असेच म्हणता येईल. अकेला देवेंद्र क्या करेगा… असे त्या म्हणालेल्या, पुढे त्यांना काय काय पाहावं लागलं हे सर्वश्रूत आहे.