केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे. नव्या दशकाचा पहिला अर्थसंकल्प आणि कोविड महामारी नंतरचा पहिलाच अर्थसंकल्प अशी या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये. या व्हिडिओमध्ये कोणत्याही राजकीय आरोप प्रत्यारोपांविना, फक्त आणि फक्त आर्थिक मुद्यांवर चर्चा तुम्हाला ऐकता येणार आहे. या नव्या दशकातील पहिल्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणारा हा न्युज डंकाचा खास व्हिडीओ.
अर्थ विश्लेषक प्राध्यापक कौस्तुभ जोशी, उद्योजक प्रशांत कारुळकर, एबीसीआयचे अध्यक्ष योगेश जोशी, ॲकमे स्टार हाऊसिंग फायनान्सचे स्ट्रॅटेजी हेड कल्पेश दवे असे मान्यवर तज्ज्ञ या चर्चेत सहभागी झाले असून नवीन अर्थसंकल्पाविषयीचे तटस्थ विश्लेषण केले आहे. न्युज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी चर्चेचे संचालन केले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. कोविड-१९ मुळे अनेक नागरिकांना लस पुरवण्याचा खर्च केंद्र सरकारला उचलावा लागणार आहे. त्यामुळे ही वाढ करण्यात आलेली आहे. चाकरमान्यांना भरावा लागणाऱ्या करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. कोविड-१९ मुळे सरकारच्या खर्चात वाढ झालेली होती. परंतु तरीही सरकारने सामान्य नागरिकांवर कराचा भार टाकलेला नाही.