गेल्या काही वर्षांत तरुणांची प्रेमप्रकरणे, लिव्ह इनचा खेळ, त्यातून सुरू होणारा संघर्ष आणि मग झालेल्या हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगाराला शासन व्हायला हवे हे खरेच पण या घटनांच्या मुळाशी जाणार आहोत की नाही?