वादळं किंवा चक्रीवादळं ही जगासाठी नवीन नाहीत. आजपर्यंत जगात अनेक ठिकाणी या वादळांमुळे फटका बसला आहे. लोकांची आयुष्य उध्वस्थ झालेली आहेत. आणि भारतालाही या वादळांमुळे मोठ्याप्रमाणावर फटका बसलेला आहे. अगदी ताजी उदाहरणं द्यायची झाली तर २०१९ मध्ये आलेल्या फेनी वादळामुळे ओडिसा आणि नजीकच्या भागात खूप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते, तसेच २०२० मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण भागात मोठे नुकसान झाले होते, यावर्षी आलेल्या तौक्ते मुळेही महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आणि आता परत एक वादळ तयार झाले आहे आणि त्याचे नाव आहे ‘ यास’. याच यास वादळाच्या निमित्ताने वादळांविषयी घेतलेला आढावा.