हरीयाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांचे लक्ष महाराष्ट्रातील मविआ नेत्यांच्या विशेषत: उबाठा शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रीयांकडे होते. संध्याकाळच्या सुमारास खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रीया आली. अनेकांना वाटले होते की बाई ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करतील. प्रत्यक्षात त्यांनी भाजपाचे अभिनंदन केले आणि काँग्रेसवर टीका केली. संजय राऊतांनीही तेच केले. दुसऱ्या दिवशी सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला त्यातही काँग्रेसची खरडपट्टी काढण्यात आली आहे. एका बाजूला काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएमचे तुणतुणे वाजवायला सुरूवात केलेली असताना उबाठा शिवसेनेचे नेते त्यांच्या सुरात सूर न मिसळता वेगळीच तान छेडतायत असे चित्र पाहायला मिळाले.