श्रीरामसेनेतील महाबलींनी रावणच्या साम्राज्याचा निप्पात केला, लंका उद्ध्वस्त केली. परंतु बिभीषण नसता तर रावणाचा सर्वनाश होऊ शकला नसता. रावणाचा अंत शक्य नसता. तिथे फक्त एक बिभीषण होता, उबाठा शिवसेनेत तर डझनभर बिभीषण बाहेर पडले आहेत. नीलम गोऱ्हे, किशोर तिवारी रोज उद्धव ठाकरेंचे नवनवे प्रताप लोकांसमोर आणतायत. मर्सिडीजनंतर आता रोलेक्सची घड्याळे, डायमंडचे नेकलेस बाहेर पडतायत. कालपर्यंत जी फक्त कुजबुज होती, तिचा आता गलका झालेला दिसतो. इथे प्रश्न हा निर्माण होतो, झाकली मुठ ठेवणे जर शरद पवारांना जमू शकते तर ते ठाकरेंना का जमलेले नाही.