स्वतंत्र भारतावर राज्य करणारे काँग्रेसी राज्यकर्ते आणि त्यांच्या लीला उत्तर कोरीयाचा हुकूमशहा किम जोंग उन यालाही मागे टाकणाऱ्या होत्या. हा देश आपल्या बापजाद्यांची मालमत्ता आहे, या तत्वावर त्यांचा अढळ विश्वास होता. नौदलाची जहाजं घेऊन शाही पिकनिक काढल्या जायच्या. नौदलाचे जवान एखाद्या वेटरसारखे शाही परीवार आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी राबायचे. शाही परीवाराशी निष्ठा दाखवण्यासाठी अशाच एका माथेफिरूने १९७८ मध्ये एअर इंडीयाचे विमान हायजॅक केले होते. ज्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावासा ठोठावायला हवा, त्या विमान हायजँकच्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला अत्यंत मामूली शिक्षा झाली. इंदीरा गांधींवर निष्ठा व्यक्त करण्यासाठी बक्षीसही मिळाले. हा घटनाक्रम आठवण्याचे कारण १९७८ साली इंदीरा गांधी यांच्या सुटकेसाठी विमान हायजॅक करणारा काँग्रेस कार्यकर्ता भोलानाथ पांडे याचे काल निधन झाले.