पक्ष वाढवण्यासाठी बाहेरची कुमक घेणे सगळ्याच पक्षांसाठी अपरीहार्य झालेले आहे. परंतु पक्षात आलेले बाटगे जेव्हा कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा शिकवू लागतात. तेव्हा एकतर त्या पक्षाचा कडेलोट झालेला असतो, किंवा येत्या काळात होणार हे निश्चित असते. भास्कर जाधव हे उबाठा शिवसेनेतील चर्चेतले व्यक्तिमत्व. पक्षाची काँग्रेस होत चालली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोकणात दशावतार प्रसिद्ध आहे. का कोण जाणे जाधव यांना ऐकताना कायम दशावतारी नाट्यातील शंखासुराची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.