महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या आग्रहास्तव सुरुवातीपासून आंदोलने केलेली आहेत. आता काही अमराठी लोकांना दमदाटी करून मराठी बोलता येत नसल्याबद्दल जाब विचारला जात आहे. मराठीचा अपमान कुणी करत असेल तर त्याबद्दल संताप येणे स्वाभाविकच आहे. पण मराठी बोलता येत नाही म्हणून खा मार याचा मनसेला फायदा होईल का?