बांगलादेशात शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यात आले. त्यानंतर बांगलादेशात प्रचंड हिंसाचार, अराजकतेचे चित्र पाहायला मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशातील हिंदू समुदायाला आंदोलकांनी लक्ष्य केले. त्यांची घरे पेटविली गेली, मंदिरांना आगी लावण्यात आल्या, अनेकांच्या हत्या झाल्या. या सगळ्या परिस्थितीत हिंदूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. भाजपा नेते सुनील देवधर यांनी पूर्वांचलात अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी या विषयावर केलेले हे विवेचन.