औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आलं आहे. आता औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असं ओळखलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर असे या शहराचे नामकरण व्हावे अशी इच्छा सामान्य नागरिकांची होती. केंद्र सरकार आणि शिंदे-फडणवीस यांच्या भाजपा-शिवसेना सरकारने सामान्य नागरिकांचे मन ओळखून शहराचे नामकरण केले. परंतु, या नामांतराविरोधात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना पोटदुखी होऊन त्यांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नामकरण करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले. मविआच्या काळात औरंगजेबाच्या कबरीवर ओवैसीने चादरही चढवली होती.