१ जूनला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यात आलेल्या अंदाजानुसार प्रत्येक एजन्सीने मोदीप्रणित एनडीएला ३५० पेक्षा अधिक जागाच दिल्या आहेत. कुणीही २६०-२९० जागा दिलेल्या नाहीत हा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सहानुभूती आहे असे वातावरण तयार केले गेले. त्याचे प्रतिबिंब या अंदाजात आहे. पण प्रत्यक्षात ती सहानुभूती पाहून लोक मतदान करतात का, हे पाहावे लागेल.