ज्या काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्यासारखा मर्यादीत बकूबाचा नेता करतोय तिथे काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांकडून कसदार युक्तिवादाची अपेक्षा काय करावी? सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे तर्कपूर्ण बोलण्याबाबत कधीच प्रसिद्ध नव्हत्या. कारण तर्क मांडण्यासाठी अभ्यास असावा लागतो, एखाद्या नेत्याची कन्या असणे पुरेसे नसते. एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात बोलताना देशाच्या सेक्युलर फॅब्रिकबाबत त्यांनी प्रचंड चिंता व्यक्त केली. या फॅब्रिकचे आधी पोतेरे आणि नंतर चिंध्या करण्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर राहीलेला आहे, याचा बहुधा त्यांना विसर पडलेला आहे, किंवा जनता काँग्रेसचे कारनामे विसरली असा त्यांचा समज झालेला आहे. देशाच्या पंतप्रधानांवर दुगाण्या झाडण्यापूर्वी त्यांनी आपल्या पिताश्रींचे आणि काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांचे प्रताप आठवून पाहावे.