निवडणूक लागल्यानंतर म्हणजेच निवडणुकीचे मतदान होईपर्यंत निवडणूक पूर्व काळामध्ये मतदार हा राजा असतो. पण या मतदार राजांना आपल्या पक्षाला मतदान केलं नाही म्हटल्यानंतर तो मतदार राजा भिके कंगाल कसा होईल हे पाहणारे राजकीय पक्ष आपल्या देशामध्ये आहेत. आणि ते आज आहेत अशातला भाग नाही गेली कित्येक वर्ष त्यांनी या देशात राज्य सुद्धा केलेलं आहे. कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक मधल्या सर्वसामान्य मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कौल दिला नाही म्हटल्यानंतर कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे. या माध्यमातून काँग्रेसचा हा खरा चेहरा आता जनतेसमोर उघडा झालेला आहे.