शेतकरी आंदोलन आणि सोरोस नावाचा सोरायसिस

शेतकरी आंदोलन आणि सोरोस नावाचा सोरायसिस

भारतात सुरु असलेले शेतकरी आंदोलन गेले काही महिने वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत आहे. ३ फेब्रुवारीच्या सकाळी या आंदोलनाच्या समर्थनात काही भारता बाहेरच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी ट्विट केले आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. पण त्या सोबतच चर्चा सुरु झाली जॉर्ज सोरोस या नावाची! या व्हिडिओमधून जॉर्ज सोरोस हा या बड्या लोकांचा बोलविता धनी आहे का? यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

पॉप सिंगर रिहाना ते पॉर्न स्टार मिया खलिफा पर्यंत व्हाया ग्रेट थर्नबर्ग यांच्यासोबत अनेकांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले. पण ही मंडळी फक्त चेहरे असून या सगळ्यांचा बोलविता धनी सोरोस आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा ‘न्युज डंका’ म्हणून आम्ही प्रयत्न केला आहे.

या आंतरराष्ट्रीय भारतविरोधी कुरबुऱ्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चांगलाच समाचार घेतला आहे. मंत्रालयातर्फे एक परिपत्रक काढून या भारत विरोधी मंडळींना चांगलेच फैलावर घेण्यात आले आहे. या नंतर भारतातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारताची बाजू लावून धरत ट्विट्सचा भडीमार केला आहे. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अजय देवगण, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्यासारखे सुपरस्टार अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. 

Exit mobile version