दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित प्रकरणाची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. यासंदर्भातील माता मृत्यू अहवाल सादर झाल्यानंतर त्यातून तनिषा भिसे यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झाले आहे. पण त्याआधी मीडियाने जो गोंधळ घालून ठेवला, त्यामुळे या प्रकरणाबद्दल रोज नवे संभ्रम निर्माण झाले.