एमआयएमचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजी नगर येथील घरी आज अनेक पक्षांचे नेते धडकले. राज्यात तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी काही नेते प्रयत्नशील आहे. जलील यांच्या घरी झालेल्या गाठीभेटी त्याचाच भाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मविआमध्ये दाखल होण्याची एमआयएम इच्छा होती. परंतु त्यांना बाहेर ठेवण्यात आले. अन्य काही पक्षांनाही एण्ट्री मिळाली नाही. ते सगळे विधानसभा निवडणुकीत एकवटण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आघाडीला आणखी एक खतरनाक ट्वीस्ट मिळू शकतो, ज्याचा संबंध थेट महायुतीशी आहे.