बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांबद्दल रोज नवनवी चर्चा होताना दिसते आहे. त्यांच्या अटकेच्या बातम्याही येत आहेत. आता तर घरोघरी खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या एजन्सीजच्या माध्यमातूनही बांगलादेशी सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्याच्या विधिमंडळात या सगळ्या प्रकरणावर मंथन झाले.