दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे कारण सांगून जामीनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले. ते बाहेर पडल्यानंतर ऑपरेशन स्वाती मालीवाल घडले. दिल्ली महीला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासावर मारहाण झाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. लखनौमध्ये सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परीषदेत केजरीवाल यांना हुडहुडी का भरली होती त्याचे कारण उघड झाले आहे.