आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ४ अश्या महिलांची कहाणी ज्या सध्या अफगाणिस्तानात तालिबान समोर बसून सुरु असलेल्या युद्धावर तोडगा काढायचा प्रयत्न करत आहेत. तालिबानसोबत सुरु असलेली चर्चा ह्यात महिलांचा प्रश्न मुख्य आहे. अनेक जाचक बंधन इस्लामच्या नावाखाली तालिबानने वर्षानुवर्षे स्त्रियांवर लादली. ह्यामुळे एक संपूर्ण पिढी मागे पडली. तालिबानच्या धार्मिक धोरणांमुळे इथल्या महिलांची फक्त प्रगतीच खुंटली नाही तर त्यांचे स्वातंत्र्य सुद्धा हिरावून घेतले गेले. आणि म्हणूनच अफगाणिस्तानात आपला जीव ओतून काम करणाऱ्या ह्या चौघी आणि अश्या अनेक विरांगनांना आम्ही सलाम करतो.