उन्हाळ्यात माणूस पाण्याची तहान आपल्यापरीने भागवू शकतो, पण पक्षी प्राणी काय करणार? कोरडे झालेले पाणवठे, ओढे, नाल्यामुळे पशूपक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागतात. पशूपक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचत असल्याने पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. या मुक्या जीवांच्या मदतीसाठी शंकर सुतार, निसर्ग माझा या युवकाने पुढाकार घेतला आहे.