मेनस्ट्रीम मीडियामध्ये चार दशके काम केलेला माणूस, ठिक एका तपापूर्वी मीडियाच्या क्षेत्रात उतरतो. एकांगी, एकतर्फी, तटस्थतेची झूल पांघरून काँग्रेसची दलाली करणाऱ्या, पुरोगामीत्वाच्या चेहऱ्याखाली हिंदू विरोधाचा एजेंडा राबवणाऱ्या मीडियाला त्यांनी तुडवायला सुरू करतो. तेव्हा मीडियाला काही समांतर उभे राहते आहे, याचा अंदाज काही लोकांना येतो. भाऊ तोरसेकर हे त्या माणसाचे नाव. आता एका तपानतंर हा समांतर पर्याय हाच मीडियाचा मुख्यप्रवाह झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजी नगरात एनलायझरने आयोजित केलेल्या युट्यूबर्सच्या कुंभमेळ्यात याची नव्याने प्रचीती आली.