पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोलणी झाली होती. त्यांना याबाबत पूर्ण कल्पना होती, या दाव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरोच्चार केला आहे. सरकार बनवण्याचे ठरले असताना ऐनवेळी पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन संसार थाटला. दोन्हीकडे सत्ता असताना त्यांनी भाजपाला सोडून शिवसेनेचा पर्याय