भारतात सध्या कोरोनाचा कहर वाढता आहे. कोरोना म्हटलं की आपल्याला आधीच चिंता भेडसावू लागते. चिंताग्रस्त मनामुळे आपला धीर खचतो. परंतु अशा वेळेस खचून न जाता विश्वासाने कोरोनाचा सामना करणे आवश्यक असते. सामान्यतः कोरोना घरी राहून योग्य काळजी घेतली आणि योग्य औषधे घेतली तरीही बरा होतो. नागपूरचे राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू शत्रुघ्न गोखले आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला होता. मात्र अशा वेळेस घाबरून न जाता त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोनाचा सामना केला. जाणून घेऊया शत्रुघ्न गोखले यांच्या कुटुंबाने कोरोनावर कशी मात केली ते.