“आनंद” च्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण
राजेश खन्नाच्या यशस्वी कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकेपैकी एक म्हणजे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित “आनंद” हा चित्रपट. हा चित्रपट मुंबईत १२ मार्च १९७१ रोजी प्रदर्शित झाला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर स्वस्तिक हे होते. या चित्रपटाने खणखणीत सुवर्ण महोत्सवी यश संपादले हे अशासाठी महत्वाचे की, राजेश खन्नाची त्या काळात प्रचंड क्रेझ असताना त्याची अतिशय भावनाप्रधान व्यक्तिरेखा रसिकांनी स्वीकारली. आपल्याकडे आता आयुष्याचे मोजकेच दिवस असून या आयुष्याचा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून मनसोक्त मनमुराद आनंद घेणारा अखंड बडबड करणारा नायक राजेश खन्नाने साकारला. अमिताभ बच्चनची डाॅक्टर भास्करची संयमित भूमिका हेदेखील या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य. गुलजार यांच्या बोलक्या संवादानी या चित्रपटाच्या कथानकात वेगळा रंग भरला. गुलजार आणि योगेश यांच्या गीताना सलिल चौधरी यांचे संगीत आहे. जिंदगी कैसी हैं पहेली…. , कही दूर जब दिन ढल जाये, मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. सत्तरच्या दशकात दूरचित्रवाणी आणि मॅटीनी शोला या चित्रपटाला पुन्हा पुन्हा रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. राजेश खन्नाच्या चाहत्यांचा हा अतिशय आवडता चित्रपट.
या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने हा “टाॅप फोकस”