तीन वर्षांपूर्वी यादिवशी मोदी सरकराने जम्मू काश्मीरसाठी मोठा निर्णय घेतला होता. या दिवशी जम्मू- काश्मीरमध्ये सरकारने दिलेले विशेष अधिकार कलम 370 रद्द केला. तीन वर्षापूर्वी जम्मू- काश्मीरचा स्वतंत्र ध्वज आणि राज्यघटना होती. कलम 370 रद्द करून आज तीन वर्ष झाली. मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्याचं दिसत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर खोऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले होते आणि मोदी सरकाराच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अनेक सकारात्मक बदल झालेत. लाल चौकात पुन्हा तिरंगा फडकला, रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. काश्मीर फाईल्स चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांच्या अत्याचाराला पुन्हा वाचा फुटली आणि काश्मिरी हिंदूंचे तिथे पुनर्वसन व्हावे याची मागणी वाढली.